वर्ल्डकप २०१५मध्ये दुसरी हॅट्ट्रीक, ड्युमिनीचा विक्रम

वर्ल्डकप २०१५मध्ये दुसऱ्यांना हॅट्ट्रीकची नोंद झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा ऑफस्पिनर जेपी ड्युमिनी याने श्रीलंकेविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हॅट्ट्रीक केली. 

AP | Updated: Mar 18, 2015, 01:23 PM IST
वर्ल्डकप २०१५मध्ये दुसरी हॅट्ट्रीक, ड्युमिनीचा विक्रम title=

सिडनी : वर्ल्डकप २०१५मध्ये दुसऱ्यांना हॅट्ट्रीकची नोंद झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा ऑफस्पिनर जेपी ड्युमिनी याने श्रीलंकेविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हॅट्ट्रीक केली. 

सिडनी क्रिकेट मैदानावर आज श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ड्युमिनीने दोन षटकांत मिळून हॅट्ट्रीक नोंदविली. ड्युमिनीने ३३ व्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर श्रीलंकेचा कर्णधार एंजेलो मॅथ्यूजला १९ रन्सवर बाद केले. त्यानंतर आपल्या पुढच्याच ओव्हरच्या पहिल्या बॉलवर नुआन कुलसेखरा याला एक रन्सवर आणि थिरिंदू कौशल याला शून्यावर एलबीडब्ल्यु करत विकेट घेत हॅट्ट्रीक घेतली. 

या विश्वकरंडक स्पर्धेतील ही दुसरी हॅट्ट्रीक असून, यापूर्वी इंग्लंडचा जलदगती गोलंदाज स्टिव्ह फिन याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात हॅट्ट्रीक घेतली होती. विश्वकरंडक स्पर्धांमध्ये हॅट्ट्रीक घेणारा ड्युमिनी हा दक्षिण आफ्रिकेचा पहिला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.