वर्ल्ड कप : 'डमी कॅच' पासून 'फिल्डिंग मॅच'पर्यंत टीम इंडियाचा आगळा सराव

टीम इंडियाने सरावाचा कंटाळवाण्या प्रकारांना पूर्णविराम देत ७५ मिनिटांचा एक आगळा वेगळा सराव केले. टीम इंडियातील सदस्यांनी या नव्या सरावाचा आनंदही घेतला. असे नाही की सरावाच्या पद्धतीत बदल करण्यात आला पण त्यात काही बदल करून त्याला अधिक इंटरेस्टिंग बनविण्यात आले. 

Updated: Feb 25, 2015, 05:58 PM IST
वर्ल्ड कप :  'डमी कॅच' पासून 'फिल्डिंग मॅच'पर्यंत टीम इंडियाचा आगळा सराव title=

पर्थ : टीम इंडियाने सरावाचा कंटाळवाण्या प्रकारांना पूर्णविराम देत ७५ मिनिटांचा एक आगळा वेगळा सराव केले. टीम इंडियातील सदस्यांनी या नव्या सरावाचा आनंदही घेतला. असे नाही की सरावाच्या पद्धतीत बदल करण्यात आला पण त्यात काही बदल करून त्याला अधिक इंटरेस्टिंग बनविण्यात आले. 

फिल्डिंग करताना दोन प्रकारांकडे सर्वांचे लक्ष गेले त्यात एक डमी कॅच होता आणि दुसरा फिल्डिंग मॅच... पहिल्या प्रकारात रिफ्लेक्स अॅक्शन अधिक चांगली करण्याचा उद्देश होता. तर फिल्डिंग मॅच मध्ये दोन संघ बनविण्यात आले. त्यात प्लास्टिकच्या स्टंपला कोणी जास्त थेट थ्रो मारले त्या संघाला विजयी घोषीत करण्यात आले. 

त्यात पहिला प्रकार अधिक इंटरेस्टिंग होता. जवळचा कॅच पकडण्यासाठी रिफ्लेक्सेस चांगले करण्यासाठी टेनिस रॅकेट आणि चेंडूंचा वापर करण्यात येतो. मात्र, सहाय्यक कोच संजय बांगर याने चार गटांमध्ये खेळाडूंना विभाजीत केले. पण टेनिस बॉल पेक्षा त्याने काही तरी वेगळे केले. हा चार फिल्डरचा समूह बांगरपासून दहा मीटरच्या अंतरावर उभा होता. त्यात बांगरने रॅकटमधून चेंडू मारल्यावर पहिला फिल्डर 'डमी' होता त्याने सोडून इतरांना कॅच पकडायचा होता. 

टेनिसच्या चेंडूमुळे कॅच खूप उंच जात होते. पण कॅच पकडण्यासाठी खेळाडूंना एका सेकंदापेक्षा कमी वेळ मिळत होता. पण समोर असलेला डमी खेळाडू शेवटच्या क्षणी बाजूला होत असते. एकच गोंधळ उडायचा. या सत्रात सुरेश रैना, रविंद्र जडेजा आणि विराट कोहली यांनी सर्वोकृष्ट प्रदर्शन केले. 

पुढील सत्र 'फिल्डिंग मॅच' चे होते. यात खेळाडूंना दोन गटात विभागण्यात आले. एक समहात रैना, कोहली, शिखर धवन आणि स्टुअर्ट बिन्नी सारख्या खेळाडूंचा आणि दुसऱ्या समूहात अश्विन, जडेजा सारखे खेळाडू होते. आठ आठ खेळाडूंच्या दोन गटांना एकमेकांपासून १० मीटरच्या अंतरावर उभे केले. त्यानंतर बांगरने चेंडू सरळ न मारता वेगळ्या कोनात मारला आणि तो पकडून सरळ प्लास्टिकच्या स्टंपला मारायचा होता. या मॅचमध्ये विराट कोहलीचा संघ विजयी ठरला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.