जगातल्या सगळ्यात सुंदर महिला क्रिकेटपटू

टी 20 वर्ल्ड कपचा फिवर सध्या भारतामध्ये सुरु आहे. पुरुषांबरोबरच महिलांचा वर्ल्ड कपही होत आहे. महिलांच्या या वर्ल्ड कपमध्ये अनेक सुंदर खेळाडू सहभागी झाल्या आहेत.

Updated: Apr 1, 2016, 10:13 PM IST
जगातल्या सगळ्यात सुंदर महिला क्रिकेटपटू title=

मुंबई: टी 20 वर्ल्ड कपचा फिवर सध्या भारतामध्ये सुरु आहे. पुरुषांबरोबरच महिलांचा वर्ल्ड कपही होत आहे. महिलांच्या या वर्ल्ड कपमध्ये अनेक सुंदर खेळाडू सहभागी झाल्या आहेत. या महिलांनी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली नसती तर त्या मॉडेलिंगच्या क्षेत्रामध्ये नक्कीच यशस्वी झाल्या असत्या. 

 

 

 

 

एलिस पेरी

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट आणि फूटबॉलच्या टीममध्ये एलिस पेरीचा समावेश करण्यात आला. 

इशा गुहा

भारतीय वंशाची असलेली इशा गुहा इंग्लंड टीमकडून क्रिकेट खेळते. बॉलर असलेल्या इशानं क्रिकेटच्या मैदानात जेवढ्या विकेट घेतल्या त्यापेक्षा कदाचित जास्त विकेट आपल्या सुंदरतेनं घेतल्या असतील. 

लॉरा मार्श

इंग्लंडच्या या स्पिन बॉलरनं अनेकांना आपलं सौंदर्य आणि स्मित हास्यानं भुरळ घातली आहे. 

मेग लॅनिंग

ऑस्ट्रेलियाच्या टीमची कॅप्टन मेग लॅनिंगच्या गालावर पडणारी खळी आणि निळ्या डोळ्यांनी अनेकांना घायाळ केलं. 

सराह जेन टेलर

विकेट कीपर असणाऱ्या सराहनं मॉडेलिंगचं करियर निवडलं असतं तर ती कदाचित जास्त यशस्वी झाली असती. 

रोसली ऍन बिर्च

इंग्लंडच्या या क्रिकेटपटूनं आपल्या सौंदर्यानं अनेकांची हिट विकेट काढली आहे. 

सना मिर

पाकिस्तानच्या महिला टीमचं नेतृत्व करणारी फास्ट बॉलर सना मिर सौंदर्याच्याबाबतीतही कोणाच्याच मागे नाही. 

डॅनियल निकोल वॅट

इंग्लंडकडून खेळणाऱ्या डॅनियलला बघता क्षणीच कोणीही प्रेमात पडू शकेल. 

कॅथरिन ब्रंट

दिसायला सुंदर असणाऱ्या कॅथरिननं मैदानातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून कॅथरिनला 2006 आणि 2010मध्ये आयसीसीनं सन्मानित केलं आहे. 

हॉली फेरलिंग

ऑस्ट्रेलियाची फास्ट बॉलर असलेल्या हॉली फेरलिंगचं स्मितहास्य बघितल्यावर कोणीही तिच्या प्रेमात पडू शकतं.