मुंबई : भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तने हे सिद्ध केले की त्याच्यासाठी माणुसकीपेक्षा मोठे काही नाही. 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या योगेश्वरने केलेली ती दोन ट्विट पाहिल्यावर तुमचाही ऊर अभिमानाने भरुन येईल.
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळालेल्या योगेश्वरला रौप्यपदक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत रशियाचा रौप्यपदक विजेता बेसिक कुदखोव्ह डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळल्याने त्याचे पदक योगेश्वरला दिले जाणार आहे.
मात्र, योगेश्वर दत्तच्या मते हे पदक त्याच्या कुटुंबियांकडेच राहायला हवे. बेसिक 2013मध्ये झालेल्या कार अपघातात मृत्यूमुखी पडला. याबाबत त्याने ट्विट करुन आपली इच्छा व्यक्त केलीये. या ट्विटवरुन योगेश्वरमधील खिलाडूवृत्ती दिसते.
बेसिक हा चांगला कुस्तीपटू होता. त्याच्या मृत्यूनंतर डोपिंग टेस्मध्ये फेल होणे हे दु:खद आहे. खेळाडू म्हणून मी त्याचा आदर करतो. जर शक्य असेल तर मेडल त्याच्या कुटुंबियांकडेच रहावे. हे त्याच्या कुटुंबासाठीही सन्मानजक असेल. माझ्यासाठी माणुसकी मोठी आहे, असे योगेश्वर ट्विटमध्ये म्हटलाय.
Besik Kudukhov शानदार पहलवान थे। उनका मृत्यु के पश्चात dope test में fail हो जाना दुखद हैं। मैं खिलाड़ी के रूप में उनका सम्मान करता हूँ।
— Yogeshwar Dutt (@DuttYogi) August 31, 2016
अगर हो सके तो ये मेडल उन्ही के पास रहने दिया जाए। उनके परिवार के लिए भी सम्मानपूर्ण होगा। मेरे लिए मानवीय संवेदना सर्वोपरि है।
— Yogeshwar Dutt (@DuttYogi) August 31, 2016