युवराजच्या वडिलांची धोनीवर पुन्हा टीका

Updated: Mar 27, 2016, 03:02 PM IST
युवराजच्या वडिलांची धोनीवर पुन्हा टीका title=

 

नवी दिल्ली : भारतीय संघाचा ऑलराउंडर क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी पुन्हा एकदा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर निशाणा साधलाय. 

योगराज यांनी शनिवारी मिड डेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान युवराजवर होत असलेल्या अन्यायाबद्दल धोनीवर कडाडून टीका केली. 

दोन वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युवराजने जोरदार कमबॅक केलंय. मात्र त्यानंतरही त्याला सातव्या नंबरवर खेळायला पाठवले जाते. What the f**k is happening? अखेर धोनीला काय सिद्ध करायचे आहे. जेव्हा बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल होतात तेव्हा क्रिकेटपटूंच्या मनात प्रश्न उपस्थित होतात. यासाठी कर्णधाराला नेहमी सावधानता बाळगली पाहिजे, अशा शब्दात त्यांनी धोनीवर टीका केली. 

युवराज दोन वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर होता मात्र त्यानंतरही त्याने जोरदार कमबॅक केलंय. दोन वर्षे बाहेर राहिल्यानंतर असे कमबॅक करुन धोनीने दाखवावे, असे योगराज म्हणाले. यावेळी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टर्निंग विकेटदरम्यान एकही बॉल युवराजला टाकू न दिल्याबद्दलही त्यांनी धोनीवर निशाणा साधला.