अखेर युवराजनं कबुल केलं, म्हणाला तिच्यात आईचं प्रतिबिंब

टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन युवराज सिंहनं अखेर आपला साखरपुडा झाल्याचं कबुल केलंय. अभिनेत्री हेजल किचसोबत त्यानं इंडोनेशियातील बाली इथं साखरपुडा केलाय.

Updated: Nov 15, 2015, 09:34 PM IST
अखेर युवराजनं कबुल केलं, म्हणाला तिच्यात आईचं प्रतिबिंब title=

मुंबई: टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन युवराज सिंहनं अखेर आपला साखरपुडा झाल्याचं कबुल केलंय. अभिनेत्री हेजल किचसोबत त्यानं इंडोनेशियातील बाली इथं साखरपुडा केलाय.

युवराजनं आज ट्विटरवरून स्वत: ही माहिती दिलीय. युवराज म्हणाला, "हो मी एंगेज्ड झालोय... मला आयुष्यातील मैत्रिणीसारखी जोडीदार मिळालीय... तिच्यात आईचं प्रतिबिंब आहे."

यानंतर हेजल किचनंही आपलं मौन सोडलं आणि म्हटलं, "हो हे खरंय, मी युवराज सिंह सोबत लग्न करतेय. त्याच्यासारखा चांगला माणूस मिळाल्याबद्दल मी खूप आभारी आहे."

आणखी वाचा - युवराज सिंगचा गुपचूप बालीत साखरपुडा

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.