क्रिकेट जगतातला 'अप्रतिम' पण 'वादग्रस्त' 'स्विच कॅच'

क्रिकेटमध्ये एका नव्या वादाला तोंड फुटलंय, पाकिस्तानच्या फवाद आलमचा झेल स्टीव्ह स्मिथने अप्रतिम टीपला खरा, पण हा 'स्विच कॅच' एक नवा वाद घेऊन आला आहे. या 'स्विच कॅच' मुळे क्रिकेटचे खेळाडू आणि चाहत्यांच्या भावना दुखावतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

Updated: Oct 15, 2014, 11:53 AM IST
क्रिकेट जगतातला 'अप्रतिम' पण 'वादग्रस्त' 'स्विच कॅच' title=

मुंबई : क्रिकेटमध्ये एका नव्या वादाला तोंड फुटलंय, पाकिस्तानच्या फवाद आलमचा झेल स्टीव्ह स्मिथने अप्रतिम टीपला खरा, पण हा 'स्विच कॅच' एक नवा वाद घेऊन आला आहे. या 'स्विच कॅच' मुळे क्रिकेटचे खेळाडू आणि चाहत्यांच्या भावना दुखावतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात काल झालेल्या तिसऱ्या वन डे सामन्यातील एक अप्रतिम कॅच सध्या चर्चेत आहे. 

नेमकं काय झालं?
ऑस्ट्रेलियाचा स्पिनर डोहर्टीच्या चेंडूवर फवाद आलम कॅच आऊट झाला. डोहार्टीने टाकलेला चेंडू टोलवण्याच्या फवादचा प्रयत्न फसला. फवादने मारलेला फटका लेग स्लिपच्या दिशेने गेला. यावेळी विषेश म्हणजे लेग स्लिपला कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. स्टिव्ह स्मिथ हा स्लिपला उभा होता. फवादच्या बॅटची दिशा पाहून, तो लेग स्लिपला धावला, आणि त्याचा सहज कॅच घेतला, या कॅचला 'स्विच कॅच' म्हटलं जातंय.

'स्विच कॅच' विवाद का?
बॉल टाकण्याआधी फिल्डरने जागा बदलवणे हे नियमबाह्य मानलं जातं, आयसीसीचा नियम 41.7 नुसार, हा कॅच रद्द करण्यात आला असता, अथवा ‘डेडबॉल’ घोषित झाला असता. या नियमानुसार फिल्डर बॅटसमनच्या हलचालीनुसार जागा बदलू शकत नव्हता. मात्र हा नियम एक ऑक्टोबर 2014 पर्यंत होता.
 
बदललेल्या नियमाचा फायदा होऊ शकतो
बदललेल्या नियमानुसार 41.8 नुसार बोलरने बॉल टाकण्याआधीच, बॅटसमन फटका मारण्याच्या स्थितीत आला, तर जवळचा फिल्डरही आपली जागा बदलू शकतो. त्यामुळेच हा स्विच कॅच असला तरी तो ग्राह्य धरण्यात येत आहे. 

पाहा वादग्रस्त 'स्विच कॅच'

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.