www.24taas.com, कोलंबो
टी २० वर्ल्डकपमध्ये आज आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध रंगतंय. सुपर-८ च्या ग्रप-दोन मध्ये टॉस जिंकून पाकिस्ताननं पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला.
भारतानं तब्बल ८ विकेट राखत पाकिस्तानला अशरक्ष: लोळवलं. सेमीफायनलसाठी टीम इंडियाचं आव्हान कायम राहिलंय. विराट कोहली हाफ सेन्चुरी ठोकून या विजयाचा शिल्पकार ठरलाय. त्याला 'मॅन ऑफ द मॅच'नं गौरवण्यात आलं.
१२८ रन्सचा पाठलाग सुरू करतानाच भारताला पहिलाच 'गंभीर' धक्का बसला. भोपळाही न फोडता गौतम गंभीर डकवर आऊट झाला. पण, त्यानंतर विरेंद्र सेहवाग आणि विराट कोहलीची चांगलीच जोड जमली. दोघांनी मिळून ७५ रन्सचा टप्पा गाठला आणि ११ व्या ओव्हरला सेहवाग आऊट झाला. आफ्रिदीनं टाकलेल्या बॉलवर सेहवाग २९ रन्स करून आऊट झाला...
विराट कोहलीचा मात्र पीचवर चांगलाच जम बसला होता. त्यानं नाबाद ७८ रन्स केले. सेहवागनंतर आलेल्या युवीनंही त्याला चांगलीच साथ देत १९ रन्स केले आणि भारतानं अगदी सहजच १२९ रन्सचं टार्गेट पार केलं.
पाकिस्तानच्या धावा -
इमरान नझीर – ८ रन्स
शाहिद आफ्रिदी – १४ रन्स
नासिर जमशेद – ४ रन्स
कामरान अकमल – ५ रन्स
मोहम्मद हाफिज - १५ रन्स
शोएब मलिक - २८ रन्स
उमर अकमल - २१ रन्स
यासिर अराफत - ८ रन्स
उमर गुल - १२ रन्स
सईद अजमल - अवघा १ रन
पाकिस्तानचा डाव १२८ रन्सवर संपलाय. पाकिस्ताननं १९.४ ओव्हरमध्ये १२८ रन्स् पर्यंत मजल मारली. त्यामुळे आता १२९ रन्सचं टार्गेट भारतासमोर आहे.
पाकिस्तानला सहावा धक्का बसलाय.... शोएब मलिक २८ रन्सवर बाद झालाय. अश्विननं टाकलेल्या बॉलला शोएबनं टोलवला खरा पण रोहीत शर्मानं त्याचा कॅच बरोबर पकडला.
मोहम्मद हाफिज आऊट झाल्यानं पाकिस्तानला पाचवा धक्का बसलाय. १२ ओव्हर्समध्ये पाकिस्तानची स्थिती ५ विकेट गमावून ८० रन्स अशी होती.
याअगोदर, दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या बुमबुम आफ्रिदीचा झेल सुरेश रैनानं सुरेखरित्या टीपला. फलंदाजीस आल्या्पासून फटकेबाजी करणाऱ्या आफ्रिदीला बालाजीने जाळयात ओढलं. आफ्रिदीनं १२ बॉलमध्ये १४ रन्स केले. याअगोदर, इरफान पठाणनं पाकिस्तानच्या इमरान नजीरला पायचीत आऊट केलं आणि पाकिस्तानला पहिला धक्का दिला. नझीरनं दोन चौकार ठोकत ८ रन्स केले.
आज भारतीय टीममध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेत. हरभजन सिंग, पियुष चावला टीममधून बाहेर आज बाहेर आहेत. तर विरेंद्र सेहवाग आणि लक्ष्मीपती बालाजीनं टीममध्ये कमबॅक केलंय. पाकिस्तानी टीममध्ये काहीही बदल करण्यात आले नाहीत. आपल्या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया टीमनंतर पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर आहे तर भारत चौथ्या स्थानावर आहे.
संघातील खेळाडूंवर एक नजर -
भारत- महेंद्रसिंग धोनी (कॅप्टन), गौतम गंभीर, आर अश्विन, लक्ष्मीिपती बालाजी, झहीर खान, विराट कोहली, इरफान पठाण, सुरेश रैना, रोहित शर्मा, युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग
पाकिस्तान- मोहम्म द हाफीज (कॅप्टन), इम्रान नझीर, कामरान अकमल, नसीर जमशेद, सईद अजमल, शाहिद आफ्रिदी, शोएब मलिक, उमर अकमल, उमर गुल, रझा हसन, यासर अराफत