www.24taas.com, पल्लेकले
आयसीसी टी- २० विश्वचषकातील दुसऱ्या सुपर ओव्हरच्या सामन्यात वेस्ट इंडिजने न्यूझीलंडचा दणदणीत पराभव केला. यापूर्वीच्या सामन्यात श्रीलंकेने न्यूझीलंडचा पराभव केला होता. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडन वेस्ट इंडिजसमोर १७ धावांचे आव्हान दिले होते. ते आव्हान वेस्ट इंडिजने १ चेंडून राखून पार केले.
सुरूवातीला खेळताना वेस्ट इंडिजने २० षटकांत सर्वबाद १३९ धावा केल्या. यात क्रिस गेलने सर्वाधिक ३० धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून ब्रेसवेल आणि टीम साऊदीने प्रत्येकी ३ विकेट घेतल्या.
वेस्ट इंडिजच्या १४० धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ २० षटकात ७ गडींच्या मोबदल्यात १३९ च्या धावाच करू शकला. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंडने १७ धावा काढल्या जिंकण्यासाठी १८ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरूवात चांगली झाली. पहिलाच चेंडू टीम साऊदीने नो बॉल टाकला. त्या चेंडूवर क्रिस गेलने षटकार लगावला. त्यामुळे शून्य चेंडू आणि ७ धावा असा धाव फलक झाला. त्यानंतर पहिल्या चेंडूवर गेलने एक धाव काढली. त्यानंतर दुसऱ्या सॅम्युअलकडे स्टाइक आली. त्यावेळी सॅम्युलने सुंदर फटका मारून दोन धावा काढल्या. तिसरा चेंडूवर सॅम्युअलने पुन्हा एका धावेसाठी टोलावला. त्यानंतर ३ चेंडू ७ धावा अशी स्थिती झाली. चौथ्या चेंडू पुन्हा साऊदीने वाईड टाकला. मग ३ चेंडू ६ धावा अशी स्थिती झाली. पाचव्या चेंडूवर गेलने पुन्हा एक धाव घेतली. मग २ चेंडू आणि ५ धावा असे समीकरण झाले. मग पाचव्या चेंडूवर सॅम्युअलने उत्तुंग षटकार ठोकून विजयश्री खेचून आणला आणि स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले.