बाप्पा पावला! टीम इंडियाने साहेबांना लोळवले!

भारताच्या १७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गत विजेत्या इंग्लड संघाची अक्षरशः भंबेरी उडाली. इंग्लडचा पूर्ण संघ केवळ ८० धावांमध्ये गारद झाला.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Sep 23, 2012, 10:38 PM IST

www.24taas.com, कोलंबो
भारताच्या १७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गत विजेत्या इंग्लड संघाची अक्षरशः भंबेरी उडाली. इंग्लडचा पूर्ण संघ केवळ ८० धावांमध्ये गारद झाला. टीम इंडियाकडून कमबॅक करताना हरभजनसिंग चार विकेट घेत इंग्लडच्या संघाला जोरदार झटका दिला. भारताकडून पियुष चावला आणि इरफान पठाण यांनी प्रत्येकी दोन तर अशोक डिंडाने एक विकेट घेतली.
इंग्लडकडून केवळ विकेट किपर किस्वेटरला सर्वाधिक ३४ धावा काढता आल्या. त्यानंतर बटलरने ११ धावा केल्या.
इरफान पठाणने भारताला चांगली सुरुवात करुन देत हेल्सचा(०) त्रिफळा उडविला. त्यानंतर पठाणनेच ल्युक राईटला(६)पायचित केले. पाचव्या षटकाच्या दुस-या चेंडूवर हरभजनसिंगने इऑन मॉर्गनचा(२) त्रिफळा उडविला.
इंग्लंडचा टी-२० सामन्यातील ही निच्चांकी धावसंख्या आहे. यापूर्वी इंग्लड २०११ मध्ये ओव्हलवर झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात त्यांनी ८८ धावा केल्या होत्या.
टीम इंडियाने निर्धारित २० षटकांत चार गडी बाद १७० धावा केल्या. रोहित शर्मा आणि सुरेश रैना नाबाद राहिले. गौतम गंभीर ४५ धावांवर बाद झाला. फिनच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. भारताने रोहित शर्माचे ५५, विराट कोहली ४० आणि गौतम गंभीरच्या ४५ धावांच्या जोरावर इंग्लंडला दिले १७१ धावांचे लक्ष्य दिले आहे.