कोणते आहेत स्वस्तात मस्त स्मार्ट फोन ?

7 हजार रुपयांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर स्मार्ट फोन मिळतात. पण नक्की कोणता फोन घ्यायचा, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. पाहूया सगळ्यात चांगले 7 स्मार्ट फोन जे सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. 

Updated: Jan 23, 2016, 11:59 PM IST
कोणते आहेत स्वस्तात मस्त स्मार्ट फोन ? title=

मुंबई : 7 हजार रुपयांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर स्मार्ट फोन मिळतात. पण नक्की कोणता फोन घ्यायचा, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. पाहूया सगळ्यात चांगले 7 स्मार्ट फोन जे सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. 
1 कूलपॅड नोट 3


कूलपॅड नोट 3 ची किंमत आहे 6,999 रुपये. या फोनमध्ये 5 इंचाचा एचडी डिसप्ले, 1.3 गीगाहर्ट्सचा क्वॉडकोर प्रोसेसर, 3 जीबी रॅम, 16 जीबी इंटरनल मेमरी आहे. 32 जीबीपर्यंतचं मायक्रोएसडी मेमरी कार्ड  आपण या फोनमध्ये टाकू शकतो. कूलपॅड नोट 3 मध्ये 13 मेगापिक्सलचा ऑटोफोकस कॅमेरा आहे, तर 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनची बॅटरी 2500 एमएएच इतकी आहे.
2 यू यूफोरिया

 
यू यूफोरियाची किंमतही 6,999 इतकीच आहे. या फोनमध्ये 5 इंचाचा एचडी डिसप्ले आहे. यूफोरिया क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 410 चिपसेटवर आहे, जो 1.2 गिगाहर्टज क्वॉडकोर प्रोसेसर, 2 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल स्टोरेजवर काम करतो.  या फोनमध्ये तुम्ही 32 जीबीपर्यंतचं मेमरी कार्ड टाकू शकता. यू यूफोरियामध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे, तर 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. या फोनची बॅटरी 2230 एमएएच आहे. 
3 श्याओमी रेडमी 2 प्राईम


हा फोन 64 बीट 1.2 गिगाहर्ट्स क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 410 प्रोसेसर, 2 जीबी रॅम, 16 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 32 जीबीपर्यंत एक्सपांडेबल कार्ड या सपोर्टसोबत आहे. श्याओमीच्या या फोनला 4.7 इंचाचा डिसप्ले आहे. तर 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा या फोनमध्ये आहे. फोनची बॅटरी आहे 2200 मेगाहर्टज. या फोनची किंमतही आहे 6,999
4 मेझू एम 2


मेजू एम 2 मध्ये 5 इंचाचा एचडी डिसप्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये 1.3 गिगाहर्टज क्वॉडकोर मीडियाटेक प्रोसेसर, 2 जीबी रॅम, 16 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. या फोनची एक्सटर्नल मेमरी 32 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. 13 मेगापिक्सलचा रियर आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असलेल्या या फोनची किंमत आहे 6,999. या फोनची बॅटरी आहे 2500 एमएएच.
5 लेनोवो ए 6000 प्लस


या फोनमध्ये आहे 1.2 गिगाहर्टज क्वाडकोर स्नॅपड्रॅगन 410 प्रोसेसर, 2 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल स्टोरेज. लेनोवोच्या या फोनमध्ये 5 इंच 720 पी चा डिसप्ले देण्यात आला आहे. तर 8 मेगापिक्सलचा रियर आणि 2 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा या फोनमध्ये आहे. या फोनची बॅटरी 2,300 एमएएच एवढी आहे. 13 तासापर्यंत टॉकटाईम देण्यात हा फोन सक्षम असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. या फोनची किंमत आहे 7,499 रुपये.
6 मोटो ई-सेकंड जनरेशन


या फोनची किंमत आहे 6,999 रुपये. तर एलटीई वेरिएंटची किंमत आहे 7,999 रुपये. मोटो ईमध्ये 4.5 इंचाचा आयपीएस स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे.  मोटो ई जेन 2मध्ये 1.2 गिगाहर्ट्ज डुअलकोर प्रोसेसर कॉलकॉम स्नॅपड्रॅगन 200, 302 एड्रीनो जीपीयू, 1 जीबी रॅम आणि 8 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. या फोनची एक्सटर्नल मेमरी तुम्ही 32 जीबीपर्यंत वाढवू शकता. एलईडी फ्लॅशसोबत असलेल्या या मोबाईलला 5 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा तर 0.3 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
7 आसूस झेनफोन सी


या फोनला 5 इंचाचा आयपीएस डिसप्ले आहे. इंटेल z2520 एटॉम रॅम प्रोसेसर, 1 जीबी रॅम आणि ऍंडरॉईड 4.4 किटकॅट वर्जन या फोनमध्ये आहे. 64 जीबीपर्यंत एक्सटर्नल मेमरी या फोनला देण्यात आली आहे. आसूसच्या या फोनला 8 मेगापिक्सलचा रियर तर 2 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनची बॅटरी आहे 2,110 एमएएच. या फोनची किंमत आहे 6,299