बजाज `डिस्कव्हर`ची हिरोच्या `स्प्लेन्डर`वर मात...

विक्रीच्या बाबतीत ‘बजाज डिस्कव्हर’नं प्रतिस्पर्धी असलेल्या हिरो मोटो कॉर्पच्या स्प्लेन्डरलाही पिछाडीवर टाकलंय. सप्टेंबर महिन्यातल्या विक्रीच्या आकड्यांच्या साहाय्यानं बजाज कंपनीनं केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 4, 2012, 02:43 PM IST

www.24taas.com, मुंबई
विक्रीच्या बाबतीत ‘बजाज डिस्कव्हर’नं प्रतिस्पर्धी असलेल्या हिरो मोटो कॉर्पच्या स्प्लेन्डरलाही पिछाडीवर टाकलंय. सप्टेंबर महिन्यातल्या विक्रीच्या आकड्यांच्या साहाय्यानं बजाज कंपनीनं केलाय.
‘बजाज कंपनीनं सप्टेंबर महिन्यात तब्बल १,२२,९६८ डिस्कव्हरची विक्री केलीय. या महिन्यात हिरोच्या स्प्लेन्डरची विक्री होती १,२१,०१८...’ अशी माहिती बजाज ऑटोचे अध्यक्ष (मोटारसायकल व्यापार) के. श्रीनिवास यांनी पत्रकारांशी बोलताना दिलीय. बजाजनं डिस्कव्हर २००४मध्ये लॉन्च केली होती.
बजाजच्या दाव्याला हिरो मोटो कॉर्पच्या प्रवक्त्यांनीही दुजोरा दिलाय. मोटो कॉर्पचे प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘स्प्लेन्डर ही आजही सर्वाधिक लोकप्रिय आणि जगभरात सगळ्यात जास्त विकली जाणारी बाईक ठरलीय. मागच्या वर्षी आम्ही तब्बल २० लाख स्प्लेंडर विकल्या होत्या आणि जवळजवळ तेवढ्याच बाईक्स याही वर्षी विकल्या जातील अशी आमची आशा आहे. परंतू गेल्या काही महिन्यांमध्ये स्प्लेन्डरची विक्री कमी झालीय आणि बजाजची डिस्कव्हर थोडी पुढे गेलीय’.
स्प्लेन्डरची मासिक विक्री मे २०१२ मध्ये २,५३,१४९ होती त्यानंतर मात्र या आकड्यांत थोडी घसरण झालीय. किंमत आणि विक्रीच्या रणनीतीमुळेच डिस्कव्हरनं आगेकूच केल्याचं बजाजला वाटतंय.