सहाव्या वर्षीच मुले पाहतायेत... `पॉर्न साईट`

लहान मुलं सध्या भलतीच टेक्नोसॅव्ही झाली आहेत. फार कमी वयात त्यांना सहज उपलब्ध असणारी मनोरंजनाची इंटरनेट सारखी साधने यामुळे त्याचे परिणामही आता दिसून येत आहेत.

Updated: May 18, 2013, 02:30 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लहान मुलं सध्या भलतीच टेक्नोसॅव्ही झाली आहेत. फार कमी वयात त्यांना सहज उपलब्ध असणारी मनोरंजनाची इंटरनेट सारखी साधने यामुळे त्याचे परिणामही आता दिसून येत आहेत. एका पाहणीनुसार खेळण्याच्या वयात मुले ‘पोर्न साईट’ आणि ‘फ्लर्टिंग’च्या अधीन झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
इंटरनेटच्या माध्यमातून वयाच्या सहाव्या वर्षीच ‘पोर्न साइट’ पाहणे आणि आठव्या वर्षी ‘ऑनलाइन प्रेमात पडणे’ या जाळ्यात मुले अडकल्याचे पाहणीत आढळून आले आहे. या पाहणीत हे धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. या सर्वांना ब्लॉक वेबसाइट्स आणि लहान मुलांच्या इंटरनेट ऍक्सेसबाबत विचारण्यात आले होते. इंटरनेटवर ही लहान मुले मोठ्या माणसासारखीच वागतात. त्यामुळे खेळण्या-बागडण्याच्या वयात ही मुले ‘लहानपणा’पासून दूर जात असल्याचे आढळून आले आहे.
५८ टक्के इलेक्ट्रॉनिक कन्टेन्टस अश्‍लील असून ई-कॉमर्सच्या माध्यमातून सर्वात जास्त महसूल याच वेबसाईटमधून मिळतो. या साइटसवर बंदी अशक्य आहे. कारण या साईटस ऍक्सेस करण्याची अनेक माध्यमे आणि प्रकार आहेत. यापूर्वी अनेकदा अशा साइट्स ब्लॉक केल्या पण त्यामुळेच या साइटसचे ऍक्सेसही वाढले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.