तुमचा `पासवर्ड` यापैकी असेल तर...

पासवर्ड प्रोटेक्शन आणि डेटा सेफ्टीसाठी काम करणाऱ्या ‘स्प्लैश डेटा’ २०१२ चे सर्वात खराब अशा २५ पासवर्डची यादीच तयार केलीय. इंटरनेटवर वापरले जाणारे हे २५ अतिशय वाईट पासवर्ड आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 6, 2013, 07:31 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पासवर्ड चोरीला जाणं किंवा हॅक होणं, ही तक्रार बऱ्याच जणांकडून ऐकायला मिळते. यावरच पासवर्ड प्रोटेक्शन आणि डेटा सेफ्टीसाठी काम करणाऱ्या ‘स्प्लैश डेटा’ २०१२ चे सर्वात खराब अशा २५ पासवर्डची यादीच तयार केलीय. इंटरनेटवर वापरले जाणारे हे २५ अतिशय वाईट पासवर्ड आहेत. हॅकर्सला अशा पासवर्डला वापरून काम तमाम करणं काही कठिण गोष्ट नाही.
कंपनीच्या मते या पासवर्डचा वापर करणाऱ्या लोकांना हॅकिंगच्या समस्येतून जाण्याचा धोका अधिक आहे. या लिस्टमध्ये टॉप तीन पासवर्ड गेल्यावर्षीही याच क्रमांकावर होते. कंपनीनं इंटरनेट वापरणाऱ्यांना यातील पासवर्ड असतील तर ते तात्काळ बदलण्याचा सल्ला दिलाय.

पाहुयात... कोणते आहेत हे धोकादायक पासवर्ड
Password
123456
12345678
abc123
qwerty
monkey
letmein
dragon
111111
baseball
iloveyou
trustno1
1234567
Sunshine
Master
123123
Welcome
Shadow
Ashley
Football
Jesus
Michael
Ninja
Mustang
password1