www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क
गुगल सर्च इंजीनचे चीफ बिझनेस अधिकारी निकेश अरोरा यांना 2013-2014 या आर्थिक वर्षासाठी 19 कोटी रुपये बोनस देण्यात येणार आहे.
गुगलमध्ये आतापर्यंतचा हा सर्वाधिक बोनस असल्याचं सांगण्यात येत आहे. निकेश अरोरा यांना मागील वर्षाच्या तुलनेने ७ लाख डॉलर अधिक बोनस मिळाला आहे.
निकेश अरोरा यांना मोठ्या प्रमाणात बोनस मिळाला, असल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
सर्वसामान्यांसाठी ही बोनसची रक्कम निश्चितच मोठी आहे.
गुगलने निकेश अरोरा यांची कामगिरी कौतुकास्पद असल्याचं म्हटलं आहे.
अरोरा यांना बोनस रक्कम जाहीर झाली असली तरी सीईओ लॅरी पेज आणि त्यांचे सह-संस्थापक सर्गेई ब्रिन यांनी नेहमी प्रमाणे बोनस घेतलेला नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.