www.24taas.com, नवी दिल्ली
अॅपलची उत्पादनं वापरणाऱ्यांना इतर कंपन्यांची उत्पादनं तेवढी जवळची वाटत नाहीत. याच आपल्या ग्राहकांना खूश करण्यासाठी आता अॅपल आय ट्यूनच्या माध्यमातून गाणंदेखील गाणार आहे.
आयपॅड, आयपॉड व आयफोनसारखी उत्पादनं उपलब्ध करून दिल्यानंतर आता अॅपलनं आय ट्यूनची सेवा उपलब्ध करून दिलीय. यासाठी अॅपलनं आयट्यून स्टोअर्सही भारतात लॉन्च केले आहेत. त्यामुळे आता आपल्या आवडीचे बॉलीवूड, प्रादेशिक चित्रपटसंगीत व पुस्तके अॅटपलच्या आयट्यून स्टोअरमधून विकत घेऊ शकतील. भारतीय आयट्यूनमध्ये एक गाणे फक्त ७ रुपयांना विकत घेता येणार आहे तर पूर्ण अल्बम ९६ रुपयांना विकत घेता येईल.
याआधी, रशिया, तुर्की आणि दक्षिण आफ्रिकेसह इतर ५५ देशांतही आयट्यून लॉन्च केलं गेलंय. या सुविधेमुळे स्थानिक लोक त्यांच्या चलनातच विविध गाणी-पुस्तके आणि अॅ प्लिकेशन्स विकत घेऊ शकणार आहेत.