www.24taas.com,झी मीडिया, नवी दिल्ली
मोबाईलमध्ये इंटरनेटचा वाढता वापर आणि त्याचा आजच्या तरुणाईवरील प्रभाव पाहता नोकियाने ३०१ बाजारात आणला आहे. याची किंमत फक्त ५३४९ रुपये इतकी आहे. यातमध्ये फिचर ३.५ जी आहे.
हा मोबाईल ड्युअल सीमचा असून यामध्ये ३जी च्या पुढील फिचर३.५जी आहे. हा फोन पिवळा, मजेंडा, काळा आणि पांढरा या रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये यूटीव्हीचा मुव्ही अँप पहिल्यापासूनच समाविष्ट असल्यामुळे एखादा चित्रपट मोफत पाहता येईल पण, डेटासाठी मात्र चार्जेस लागतील.
२.४ इंचची एलसीडी स्क्रीन आणि २४०x३२० पिक्सलचा रिजॉल्यूशन असलेला हा फोन नोकियाच्या सीरीज ४०या ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो. या फोनमध्ये नोकिया एक्सप्रेस ब्राउझर पहिल्यापासूनच समाविष्ट आहे यामुळेच यातील डेटा एफिशियंसी ९०टक्क्यांपर्यंत वाढू शकते असा कंपनीने दावा केला आहे. व्हिडीओ स्ट्रिमिंगवाला हा नोकियाचा पहिला फोन आहे जो इतका स्वस्त दरात उपलब्ध आहे.
या फोनमध्ये ३.२ मेगापिक्सलचा कॅमेरा असून यात फ्रंट कॅमेरा नाही. मात्र यामध्ये कंपनीने एक असा वॉईस फिचर टाकला आहे जो तुम्हाला कॅमेराची दिशा सांगेल. ६४ एमबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनमध्ये ३२ जीबी इतकी एक्सपांडेबल मेमरी आहे.
एफएम रेडिओ, २ जी आणि ३ जीवर ५०४ तासांचा स्टॅंडबाय टाईम असलेला हा फोन १०२ग्रॅम वजनाचा आहे. कंपनीने यात २जीवर २० तास तर, २जीवर ६ तास इतका टॉकटाईम दिला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.