www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ज्या दुर्गम भागात इंटरनेट कनेक्शन पोहचत नाही, त्या ठिकाणी फुग्यांमार्फत इंटरनेट पोहचवण्यासाठी गुगल सज्ज झालंय. `प्रोजेक्ट लून` या प्रकल्पाची घोषणा गुगलंनं नुकतीच न्यूझीलंडमध्ये करण्यात आलीय.
जगभरात 2.2 अब्ज इंटरनेत यूजर्स असले तरी अद्याप जवळपास 5 अब्ज व्यक्तींपर्यंत गूगल पोहचलेलं नाही. गुगलचा हा प्रकल्प यशस्वी झाल्यास फायबर ऑप्टिक्सचे जाळे टाकण्याचा खर्च वाचणार आहे. यामुळे अग्नेय आशिया आणि आफ्रिका खंडात इंटरनेटचा वापर प्रचंड प्रमाणात वाढेल अशी आशा संगणक तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. मात्र यासाठी ग्राहकांना किती पैसे मोजावे लागतील हे गुगलनं अद्याप स्पष्ट केलेलं नाही.
पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे १२ मैल उंचीवर पॉलिएथिलीन फिल्मपासून बनलेल्या जेलिफिशच्या आकाराचे अवाढव्य बलून सोडले जातात. त्यातील अँटेनाद्वारे इंटरनेट सिग्नल्सचे प्रसारण केले जाते आणि यूजरच्या घरावरील रिसीव्हर ते पकडतात.
गुगलचे बलून्स यशस्वी ठरल्यास फायबर ऑप्टिक्सचे जाळे टाकण्याचा खर्च वाचल्याने आफ्रिका आणि आग्नेय आशियासारख्या भागांमध्ये इंटरनेटचा वापर प्रचंड प्रमाणात वाढेल, अशी आशा आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.