www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
अवघ्या दोन वर्षांपूर्वी मोबाइल हॅण्डसेट बाजारपेठेत आलेल्या मायक्रोमॅक्स कंपनीने स्मार्टफोन बाजारात दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर आता ही कंपनी महागडे स्मार्टफोन आणि विदेशी बाजारपेठेत विस्तार करू इच्छित आहे.
मायक्रोमॅक्स ही बाजारात सूचीबद्ध नसलेली कंपनी आहे. जुलै ते सप्टेंबर २0१३ तिमाहीत या कंपनीने २२ लाख स्मार्टफोन विकले आहेत. येत्या मार्च २0१४ मध्ये समाप्त होणार्याप आर्थिक वर्षात ही कंपनी ६२00 कोटी रुपयांच्या विक्रीचा टप्पा ओलांडणार आहे. आतापर्यंत ही कंपनी भारतीय बाजारात स्वस्त किमतीचे हॅण्डसेट आणि स्मार्टफोन विकत होती.
यापुढे कंपनीने महागड्या फोनच्या बाजारात उतरायचा निर्णय घेतलेला आहे. तसे देशातील बाजारपेठेप्रमाणे विदेशी बाजारपेठेत शिरकाव करण्याचेही ठरवले आहे.
नोकिया आणि सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स यांच्यानंतर भारतात मायक्रोमॅक्स कंपनी मोबाइल विक्रीत तिसर्याक क्रमांकावर आहे. ऑक्टोबर महिन्यात कंपनीने १९000 रुपये किमतीचा टॅब्लेट बाजारात दाखल केला होता. कंपनीच्या बॅ्रण्ड अँम्बेसेडरपदावर हॉलीवूडचा स्टार हग जॉकमॅन यास नियुक्त केले होते. आता कंपनी बाजारपेठ विस्तार करण्यासाठी अधिक आक्रमक होणार आहे.
स्वस्त फोन प्रमाणेच हायएण्ड महागडे फोनदेखील बाजारात सादर करण्याचा मनसुबा कंपनीने ठेवला आहे. भारतात दरवर्षी अडीच कोटी मोबाइल फोन विकले जातात. यात स्मार्टफोनचा वाटा २0 टक्के असतो. आपल्या फोनच्या किमती कमी ठेवण्यासाठी मायक्रोमॅक्स कंपनी मेडियाटेक किंवा स्प्रेडट्रम कंपन्यांचे चीपसेट वापरते. यामुळे या कंपनीचे मोबाइल इतर कंपन्यांच्या मोबाइलपेक्षा स्वस्त असतात.
कंपनीचा स्वत:चा कारखाना नाही. सर्व माल चीन आणि तैवान या देशांतून आयात केला जातो. पुढील तिमाहीपासून ही कंपनी आपले काही ब्रॅण्ड उत्तर भारतातील कारखान्यात निर्माण करणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.