आता, संवाद साधा तुमची भाषा न समजणाऱ्यांसोबत!

सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्ट कंपनीनं ‘रिअल टाईम व्हॉइस ट्रान्सलेशन’च्या सुविधा निर्माण केल्याचा दावा केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 29, 2014, 07:45 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्ट कंपनीनं ‘रिअल टाईम व्हॉइस ट्रान्सलेशन’च्या सुविधा निर्माण केल्याचा दावा केलाय. २०१४ साल संपण्यापूर्वीच आपल्या ‘स्काईप मॅसेजिंग’च्या साहाय्यानं याच सुविधेची सुरुवात करण्यात येईल, असं कंपनीनं स्पष्ट केलंय.
अमेरिकन सॉफ्टवेअर कंपनीनं कोड कॉन्फरन्समध्ये नवं ‘स्काइप ट्रान्सलेटर’ प्रदर्शित केलं. कंपनीच्या म्हणण्यानुसार, स्टार ट्रेसच्या सायन्स फिक्शन सीरिजमध्ये ‘जागतिक अनुवादका’चं काम ही सुविधा करू शकेल.
काय आहे ‘रिअल टाईम व्हॉइस ट्रान्सलेशन’ सुविधा
सध्या स्काईप या मॅसेजिंग अॅप्लिकेशनद्वारे तुम्ही दूरवर टेक्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधू शकता. ‘स्काइप ट्रान्सलेटर’ द्वारे तुम्ही कोणत्याही भाषेत बोलत असाल तरी तुमच्या बोललेल्या शब्दांचा सरळ भाषांतर होऊ शकेल. म्हणजेच, तुमच्यासमोर बसलेला व्यक्ती कोणत्याही भाषेत बोलत असेल तरी त्याची भाषा तुम्हालाही समजू शकेल... आणि तुमची त्याला...
‘स्काइप ट्रान्सलेटर’ इतर भाषा बोलणाऱ्या व्यक्तींची भाषा अनुवादित करून तुमच्यापर्यंत पोहचवू शकेल... अगदी त्याच क्षणी... त्यामुळे तुम्हाला भाषेचा अडथळा जाणवणार नाही आणि तुम्ही तुमची भाषा न समजणाऱ्या व्यक्तींशीही अगदी सहज संवाद साधू शकाल. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला यांनी कॅलिफोर्नियामध्या याचाच एक डेमो सादर केला.
नडेला यांनी फेब्रुवारीमध्ये मायक्रोसॉफ्टच्या सीईओ पदाचा कारभार हाती घेतलाय. कंपनीला पुन्हा एकदा टेक्नॉलॉजी लीडर म्हणून पुढे आणण्याचा त्यांचा मानस आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.