www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
तुम्हाला मोबाईल कनेक्शन घेणे आता सोपे झाले आहे. हा पुरावा द्या, ते कागद द्या यातून तुमची सुटका होणार आहे. केवळ एकच पुरावा म्हणून पुरेसा ठरणार आहे. तो आहे आधार कार्डचा.
मोबाईल कनेक्शन घेण्यासाठी ‘आधार’ची जोड मिळणार असल्याने पॅन कार्ड, वाहन चालक परवाना आणि इलेक्ट्रिक बिलाची झेरॉक्स यासारख्या कागदपत्रांच्या कटकटीतून मुक्तता मिळणार आहे. याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर मोबाईल कनेक्शन देताना विक्रेत्याला ग्राहकाच्या बोटांचे ठसे घेऊन ते ‘युआयडी कार्ड डेटा’शी जुळवून घ्यावे लागणार आहे.
हे ठसे एकदाचे जुळले की, तुम्हाला कोणत्याही अन्य कागदपत्रांची गरज राहणार नाही, अशी माहिती दूरसंचार खात्यातील एका वरिष्ठ अधिकार्यायने दिली आहे. केवळ आधार कार्ड दाखवा आणि नवे मोबाईल कनेक्शन घ्या, अशा प्रस्तावावर केंद्र सरकार गंभीरपणे विचार करीत असून, यावर्षीच्या अखेरीस मोबाईल कनेक्शनला ‘आधार’ मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.