www.24taas.com, न्यूयॉर्क
महिलांवर होणाऱ्या लैगिंक अत्याचाराला आळा घालण्यासाठी मोबईल धावून येणार आहे. मोबाईलमध्ये नवं अॅप लॉन्च करण्यात आलं आहे. आणि या अॅपच्याच साह्याने होणारे अत्याचारापासून महिलाचं संरक्षण करता येणार आहे.
एखाद्या महिलेवर होणार्या लैंगिक अत्याचाराचा सतर्क करणारे मोबाईल अॅप्लिकेशन नुकतीच लॉन्च करण्यात आले आहे. या अॅपमुळे संकटात असणार्या महिलांना तत्काळ मदत मिळविता येणार आहे. या अॅपद्वारे आपल्यावर अत्याचार होत असल्याची माहिती पीडित महिला पोलिसांसह तिचे नातेवाईक तसेच मित्रमंडळींना क्षणात देवू शकते.
`लाइफ लाइन रिस्पॉन्स` असे या अॅप्लिकेशनचे नाव आहे. एका अमेरिकन कंपनीने हे लॉन्च केले आहे. आयफोन आणि अॅंड्राईड फोनवर हे अॅप कार्य करू शकते. नातेवाईक आणि मित्रमंडळी यांचे मोबाइल नंबर आणि ई-मेल अॅड्रेस संपादीत केले जातात. सध्या हे अॅप अमेरिकेत सुरू करण्यात आले आहे. संकट काळात हे अॅप कार्यान्वित केल्यानंतर क्षणात त्याचा सतर्क कॉल संबंधित नंबर्सवर येतो.