अबब..जगात फेसबुक, जीमेलचे २० लाख पासवर्ड चोरीला

तुमचे फेसबुक, जीमेलचे अकाऊंट आहे का? असेल तर सावधान. कारण तुमचं अकाऊंट हॅक होण्यापेक्षा सध्या पासवर्ड चोरीचा घटनांत वाढ झाली आहे. जगातील तब्बल २० लाख पासवर्ड चोरीला गेलेत. एवढ्यावर न राहता सायबर चाच्यांनी ते सर्वांसाठी इंटरनेटच्या माध्यमातून खुले करण्यात आलेत. हे वाचून धक्का बसला ना. मग तुमचे अकाऊंट सेफ आहे, असं तुम्ही म्हणू शकाल का?

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 5, 2013, 08:17 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था,लंडन
तुमचे फेसबुक, जीमेलचे अकाऊंट आहे का? असेल तर सावधान. कारण तुमचं अकाऊंट हॅक होण्यापेक्षा सध्या पासवर्ड चोरीचा घटनांत वाढ झाली आहे. जगातील तब्बल २० लाख पासवर्ड चोरीला गेलेत. एवढ्यावर न राहता सायबर चाच्यांनी ते सर्वांसाठी इंटरनेटच्या माध्यमातून खुले करण्यात आलेत. हे वाचून धक्का बसला ना. मग तुमचे अकाऊंट सेफ आहे, असं तुम्ही म्हणू शकाल का?
जगातील वेगवेगळ्या वेबसाईट्सवरील तब्बल वीस लाखांपेक्षा जास्त पासवर्ड चोरी झालेय. हे पासवर्ड इंटरनेटवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यामध्ये जीमेल, फेसबुक, याहू सारख्या इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंग साईटसचा समावेश आहे. जगातील इंटरनेट यूजर्सचा समावेश या २० लाख पासवर्डमध्ये आहे.
२० लाख पासवर्डमध्ये सर्वाधिक पासवर्ड हे फेसबुक यूजर्सचे आहेत. फेसबुकच्या जवळपास ३२६००० यूजर्सचे पासवर्ड चोरी करून ते या सर्व्हरवर प्रकाशित करण्यात आले आहेत. त्यानंतर गूगल अकांऊटचे तब्बल ६०००० पासवर्ड या सर्व्हरवरून इंटरनेटवर पोस्ट केले आहेत, अशी माहिती ट्रस्टवेव्ह स्पायडर लॅबने केलेल्या संशोधनानंतर पुढे आली आहे.
नेदरलँडमधील एका इंटरनेट सर्व्हरचा शोध घेताना त्यांना पासवर्ड चोरीचा छडा लागला. सायबर चाच्यांनी ही चोरी केलीय. या सर्व्हरवर त्यांना जगभरातील ९० हजार इंटरनेट साईट्सचे पासवर्ड मिळाले आहेत. हे सर्व पासवर्ड यूजर्सचे असून इंटरनेटवर पोस्ट करण्यात आले आहेत. तर याहूचे जवळपास ५९००० पासवर्ड चोरी करण्यात आले आहेत. त्यानंतर ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटचा क्रमांक लागतो. ट्विटरच्या २२००० यूजर्सच्या पासवर्डची चोरी करण्यात आलीय.
पासवर्ड चोरी गेलेल्या इंटरनेट यूजर्समध्ये सर्वाधिक अमेरिका, जर्मनी, सिंगापूर आणि थायलंड या देशातील यूजर्स सर्वाधिक आहेत. त्यानंतर अन्य काही देशांचा क्रमांक असल्याचा दावाही स्पायडर लॅबने केलाय. सर्व इंटरनेट यूजर्सना दिलासा देणारी बाब म्हणजे, ज्या पॉन्टी बॉटनेट सर्व्हरवर हे लाखो पासवर्ड सापडले आहेत, त्या सर्व्हरच्या मालकी असलेल्या कंपनीला आणि नेदरलँड सरकारला हे सर्व पासवर्ड काढून टाकण्याची विनंतीही ट्रस्टवेव स्पायडरलॅबने केलीय.
सर्वाधिक पसंतीचा पासवर्ड म्हणजे १२३४५६ असा आहे. हाच सोपा पासवर्ड तब्बल १६००० इंटरनेट यूजर्सचा आहे. त्यानंतरचे सर्वाधिक वापरले जाणारे पासवर्ड म्हणजे Password हा शब्द किंवा Admin किंवा केवळ १ हा आकडा पासवर्ड म्हणून सर्वाधिक वापरला जातो. त्यामुळे तुम्ही पासवर्ड जरा वेगळा टाका. किंवा सातत्याने बदलत राहा. नाहीतर तुमची महत्वाची माहिती लिक होईल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.