दहावीची नवी पुस्तके महिनाभर रखडणार!

विद्यापीठाच्या परीक्षांची तारीख अनिश्चित असताना आता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या त्रासातही भर पडणार आहे. दहावीची नवी पुस्तके महिनाभर रखडण्याची चिन्ह आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 17, 2013, 07:44 PM IST

www.24taas.com, मुंबई
विद्यापीठाच्या परीक्षांची तारीख अनिश्चित असताना आता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या त्रासातही भर पडणार आहे. दहावीची नवी पुस्तके महिनाभर रखडण्याची चिन्ह आहेत.
नव्या अभ्यासक्रमाच्या मसुद्यास राज्य शिक्षण मंडळाकडून मान्यता न मिळाल्यानं अद्याप पुस्तकांच्या छपाईला सुरूवातच झालेली नाही. येत्या शैक्षणीक वर्षापासून दहावीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. शास्त्र आणि गणित विषयांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये यापूर्वीच बदल करण्यात आलाय मात्र अन्य पाठ्यपुस्तकांचा मसुदा राज्य शिक्षणमंडळाकडून अंतिम करण्यात आला नसल्याचे अभ्यास मंडळातील सदस्यांनी सांगीतलंय. मंजूरी मिळाल्यानंतर पुस्तकं छापुन बाजारात येईपर्यंत एक महिन्याचा कालावधी वागतो. त्यामुळे दहावीच्या आगामी वर्षातील विद्यार्थ्यांना सुट्टीच्या वर्गात पुस्तकांशिवाय अभ्यास करावा लागण्याची शक्यता आहे.

मात्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी ही शक्यता फेटाळली आहे. पाठ्यपुस्तकांचे काम व्यवस्थित सुरू असून एप्रिलच्या दुस-या आठवड्यापर्यंत मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाची पुस्तके उपलब्ध होतील असा दावा त्यांनी केलाय