www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई
बाजारात नुकताच लाँच झालेल्या नोकियाच्या अँड्रॉईड फोनला चांगलाच प्रतिसाद मिळतोय. असं असतानाच फिनिश कंपनीनं नोकियाचा स्वस्तातला डयुयल सिमचा बेसिक फोन `नोकिया २२०` लॉन्च केलाय. `नोकिया २२०` ज्यांना टचफोन आवडत नाही किंवा वापरताना अडचण येते अशा खास ग्राहकांच्या पसंतीस पडणार आहे.
फोनमध्ये २ मेगापिक्सल कॅमेरा असून, २X पर्यंत झूम होतो. यामध्ये अल्फान्यूमेरिक कीपॅड आहे आणि नोकिया ओएस प्लॅटफॉर्मवर चालतो. फोन ड्युयल सिम आहे. फोनची स्क्रीन २.४ इंच आणि रिझोल्यूशन ३२०X२४० पिक्सेल आहे.
मात्र फोनमध्ये इंटरनल मेमरी खूपच कमी आहे. फोन ३२ जीबी मायक्रो एसडी कार्डला सपोर्ट करतो. यांची बॅटरी ९७० एमएएच असून, १५ तासापर्यंत फोनवर चालू शकतो. तसंच फोनमध्ये एफएम, 2जी, ब्लूटुथ ३.०, मायक्रो यूएसबी, मायक्रो एसडी कार्ड स्लॉट, ३.५ एमएम ऑडिओ जॅक आणि डब्लूएच-१०८ हेडसेट उपलब्ध आहे.
`नोकिया २००`फोनची खासियत म्हणजे या फोनचं वजन फक्त ८३ ग्रॉम आहे. एकूणच हा एक बेसिक फोन आहे आणि याची किंमत फक्त २,७४९ आहे. ‘नोकिया २००’ फोन बाजारात नोकिया स्टोअरमध्ये उपलब्ध आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.