www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सध्या अँड्रॉईड फोनची स्पर्धा बाजारात वाढतेय. यास्पर्धत उतरण्यासाठी नोकियासुद्धा मागे नाही. लवकरच फिनिश कंपनीचा `नोकिया X` बाजारात येतोय. भारतात नोकियाचा अँड्रॉईड फोन `नोकिया एक्स` लॉन्च होतोय.
फेब्रुवारी २०१४मध्ये एमडब्लूसीनं `नोकिया एक्स` अँड्रॉईड फोनमधील अनेक खास गोष्टी सांगितल्या.
> `नोकिया एक्स` फोन ४ इंच एलसीडी टचस्क्रीन असून, (480X800 पिक्सल) स्क्रीन रिझोल्यूशन आहे.
> फोनमध्ये 1GHz Qualcomm स्नॉपड्रॉगोन एस४ ड्युअर कोर प्रोसेसर आहे. `नोकिया एक्स` सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म `व्ही1 (V1)` वर चालते.
> `नोकिया एक्स` फोनमध्ये ३ मेगापिक्सल कॅमेरा आहे. कॅप्चर मोड आणि कलर टोन मोड सह 4x पर्यंत डिजिटल झूम होईल. फोनमध्ये ४ जीबी इंटरनल मेमरी असून, ती मायक्रो एसडी कार्ड वापरुन ३२ जीबीपर्यंत वाढवता येईल. रॅम ५१२ एमबी आहे.
> १५०० एमएएच बॅटरी असल्यामुळं फोनवर २जी सेवेत १३ तास आणि ३जी सेवेत १०तास बोलू शकतो. २जी वर ६७२ तासापर्यंत अतिरिक्त वेळ दिलाय.
> भारतात `नोकिया एक्स` स्वस्त किंमतीत ८,५०० रुपयांत उपलब्ध आहे.
लवकरच भारतात नोकिया अँड्रॉईडसोबत `नोकिया एक्स प्लस` आणि `नोकिया एक्स एल` बाजारात येणार आहे. तसेच त्याला येत्या दोन महिन्यांत चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यक्त केली जातेय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.