www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
असूसने नवा पॅडफोन लॉंन्च केला आहे. या डिव्हाईसचे नामकरण त्यांनी पॅडफोन- 2 असे ठेवले आहे. असूस ग्राहकांना क्वॉड कोअर स्मार्टफोन आणि टॅबलेट दोन्हीही देणार आहे. याचबरोबर 4.7 इंचीचा अॅड्रायड स्मार्टफोन आहे. जो पॅडफोन- 2 स्टेशनमध्ये बसवल्यानंतर बनतो 10.1 इंचाचा टॅबलेट.
पॅडफोन-2 मध्ये असूसने आधीच्या पॅडफोनपेक्षा चांगल्या फिचर्सचा समावेश केला आहे. 4.3 इंचाच्या मागील पॅडफोनपेक्षा वेगळया डिव्हाईसच्या स्मार्टफोनमध्ये सुपर IPS+ टेक्निकने युक्त 4.7 इंचाची स्क्रीन आहे.
जर तुम्हाला या फोनची स्क्रीन छोटी वाटत असेल तर पॅडफोन स्टेशनबरोबर याला कनेक्ट करा. म्हणजे तुम्हाला मिळेल 10.1 इंचाची स्क्रीन जी 1280x800 रिझोल्यशून इतकी असेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.