www.24taas.com, वॉशिंग्टन
ग्राफीनच्या मदतीनं एक असा मोबाईल बनवला जाऊ शकतो, जो जाडीला एखाद्या कागदापेक्षाही कमी असेल... लवचिक असेल... असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केलाय.
ग्राफीनला स्टीलपेक्षाही १०० टक्के मजबूत मानलं जातं. त्यामुळे ग्राफीनच्या साहाय्यानं मोबाईल तयार करण्यात आला तर ती आयटी क्षेत्रातील एक क्रांतीच असेल, असं म्हटलं जातंय. अतिशय पातळपणा आणि पारदर्शकता ही या मोबाईलची खासियत असू असेल... अमेरिकन केमिकल सोसायटीच्या म्हणण्यानुसार, स्मार्टफोन क्षेत्रात ग्राफीनचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकेल.
हिरा आणि कोळशाप्रमाणेच ग्राफीनही पूर्णत: कार्बनचा बनलेला असतो. संशोधकांच्या म्हणण्यानुसार ग्राफीनचे कार्बन दोन वेगवेगळ्या दिशांना असतात. आणि त्यामुळेच ग्राफीन अतिशय मजबूत आणि लवचिक असतं. 0