पहिल्या ई-मेलचा ४०वा वाढदिवस

अमेरिकेतील प्रोग्रामर रे टॉमिल्सन यांनी पाठवलेल्या पहिल्या ई-मेलला आज ४० वर्षं पूर्ण झाली आहेत. ४० वर्षांपूर्वी पहिला ई-मेल सेंड झाला आणि संभाषणाचं नवं माध्यम जन्माला आलं. मात्र भारतात ही क्रांती घडायलसा पुढची २० वर्षं जावी लागली होती.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 10, 2012, 02:48 PM IST

www.24taas.com, न्यू यॉर्क
अमेरिकेतील प्रोग्रामर रे टॉमिल्सन यांनी पाठवलेल्या पहिल्या ई-मेलला आज ४० वर्षं पूर्ण झाली आहेत. ४० वर्षांपूर्वी पहिला ई-मेल सेंड झाला आणि संभाषणाचं नवं माध्यम जन्माला आलं. मात्र भारतात ही क्रांती घडायलसा पुढची २० वर्षं जावी लागली होती.
१९७१च्या ऑक्टोबर महिन्यात टॉमिल्सनने एका कॉम्प्युटरवरून दुसऱ्या कॉम्प्युटरवर पत्र पाठवणाऱ्या सॉफ्टवेअरची निर्मिती केली होती. हा चमत्कार त्याने इंटरनेट जन्माला येण्यापूर्वी केला होता.
१९६० सालीच टॉमल्सनने SNDMSG या प्रोग्रामद्वारे एकाच कॉम्प्युटरमध्ये एकीकडून दुसरीकडे पत्र पाठवण्याचं तंत्र विकसित केलं होतं. यात मेल कम्पोज करून, त्यावर पत्ता लिहून ते दुसऱ्या युरला सेन्ड करण्याची व्यवस्था होती. आजमितीला हे तंत्र इतकं विकसित झाले आहे की जगात दिवसाला अब्जावधी ई-मेल्स एकीकडून दुसरीकडे जात असतात.