ट्विटरवर `लाईव्ह व्हिडिओ` शेअर करणंही होणार शक्य

सोशल वेबसाईट ट्विटर आपल्या यूजर्सना एक नवीन आणि महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 20, 2014, 03:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सोशल वेबसाईट ट्विटर आपल्या यूजर्सना एक नवीन आणि महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे... या सुविधेमुळे तुम्ही सोप्या पद्धतीनं लाईव्ह व्हिडिओ किंवा एखाद एडिट व्हिडिओ झटपट तुमच्या फॉलोअर्ससोबत शेअर करू शकता.
ट्विटरनं व्हिडिओ शेअरिंग आणि एडिंटींग प्लॅटफॉर्म असलेलं ‘स्नॅप्पीटीव्ही’ खरेदी केलंय. हा व्यवहार नेमका किती रुपयांना झाला हे मात्र अजूनही गुपितच आहे.
‘स्नॅप्पीटिव्ही’चा जन्म 2010 मध्ये झाला होता. या टेक्नॉलॉजीचा मीडिया तसंच वेगवेगळ्या ब्रँन्डशी जोडलेल्या कंपनींना मोठ्या प्रमाणावर झाला. यामुळे, ‘रिअल टाईम ब्रॉडकास्ट क्लिप’ म्हणजेच लाईव्ह फुटेज एडिट करणं आणि लगेचच ते इतरांशी शेअर करणं शक्य झालं. या टेक्नॉलॉजीमुळे ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर हे फुटेज पाहणं शक्य होतं.
ट्विटरने ही सुविधा अंमलात आणल्यानंतर, हीच टेक्नॉलॉजी वापरून स्पोर्टस् मॅचचे हायलाईटस क्षण लगेचच दाखवता येणंही शक्य होणार आहे. तसंच ब्रेकिंग न्यूजही लगेचच दाखवलं जाऊ शकेल. आपले आवडते क्षणही तुम्हाला लगोलग शेअर करता येतील.
‘ट्विटर सध्या व्हिडिओ सेगमेंटमध्ये बरीच गुंतवणूक करतंय. टीव्ही ब्रॉडकास्ट, बिझनेस आणि इव्हेंट प्रोड्युसर्सना झटपट हाय क्वालिटी व्हिडिओ शेअर करता येईल, अशी सुविधा उपलब्ध करून देणं आता आमच्यासाठी महत्त्वाचं आहे’ असं म्हणत ट्विटरचे डायरेक्टर (प्रोडक्ट मॅनेजमेंट) बलजीत सिंह यांनीही या बातमीला दुजोरा दिलाय.
तसंच, ‘ट्विटरसोबत आम्ही लाईव्ह कव्हरेजसाठी ओपन प्लॅटफॉर्म अविरत सुरु ठेऊ’ असं स्नॅप्पीटिव्हीकडून स्पष्ट करण्यात आलंय.
गेल्या काही दिवसांपासून ट्विटर व्हिडिओ आणि फोटोवर जास्त लक्ष देत आहे. काही दिवसांपूर्वी ट्विटरनं अँन्ड्रॉईड, आयफोन आणि वेबवर GIF फॉरमॅटदेखील उपलब्ध करून दिलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.