कार्बन टायटेनियम S1 प्लस लॉन्च, सर्वात स्वस्त क्वॉड-कोर स्मार्टफोन!

कार्बन टायटेनियम S1 प्लस भारतात ऑफिशिअली लॉन्च झालाय. क्वॉड-कोर प्रोसेसर असलेला हा देशातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 20, 2014, 04:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
कार्बन टायटेनियम S1 प्लस भारतात ऑफिशिअली लॉन्च झालाय. क्वॉड-कोर प्रोसेसर असलेला हा देशातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे.
कार्बननं या 6490 रुपये किमतीत लॉन्च केलंय. मात्र हा ऑनलाइन रिटेलर इंडियाटाइम्स शॉपिंगवर केवळ 5390 रुपयांमध्ये विकला जातोय. या किमतीतला हा सर्वात स्वस्त क्वॉड-कोर स्मार्टफोन आहे. कार्बननं आता जरी त्यांच्या लॉन्चिंगची घोषणा केली असली तरी एप्रिल महिन्याच्या अखेरीसच याची विक्री सुरू झाल्याची बातमी आम्ही आपल्याला दिलेलीच आहे.
कार्बन टायटेनियम S1 प्लस हा फोन ड्यूल-सिमला सपोर्ट करतो आणि अँड्रॉईड 4.3 जेली बीन वर चालतो. यात 480x800 पिक्सेल्स रिझॉलूशनचा 4 इंचचा फोनला डिस्प्ले आहे. यात 1.2 गीगाहर्ट्स क्वॉड-कोर प्रोसेसर आणि एक जीबी रॅम आहे.
यात मागच्या बाजूला एलइडी फ्लॅश सोबत 5 मेगापिक्सेल्सचा कॅमेरा आहे. 0.3 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमरा आहे. इंटर्नल स्टॉरेज 4 जीबी आहे आणि 32 जीबीपर्यंतची मायक्रो-एसडी कार्ड यात लावू शकतो.
बॅटरी 1500mAh आहे. कनेक्टिविटी ऑप्शंसमध्ये जीपीआरएस, एज, 3G, वाय-फाय, ब्लूटूथ आणि जीपीएसचा समावेश आहे. यात एफएम रेडिओ सुद्धा आहे. हा स्मार्टफोन काळ्या आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध आहे.
शिवाय कालच 8990 रुपये किमतीचा कार्बन टायटेनियम S9 लाइट ही लॉन्च झालाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.