भिवंडीत कोसळली इमारत; तिघांचा मृत्यू

भिवंडीमध्ये नारपोली परिसरात एक दोन मजली इमारत जमीनदोस्त झालीय. रात्री साडेबारा ते दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 4, 2013, 03:08 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, भिवंडी
भिवंडीमध्ये नारपोली परिसरात एक दोन मजली इमारत जमीनदोस्त झालीय. रात्री साडेबारा ते दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यामध्ये तिघांचा मृत्यू झालाय तर जवळजवळ ३५ जण जखमी झाल्याचं समजतंय.
अरिहंत कॉम्प्लेक्स या औद्योगिक वसाहतीतील ही दोन मजली इमारती कोसळलीय. यामध्ये गारमेंटचं शिलाईकाम सुरू होतं. दुर्घटना घडली त्यावेळी इमारतीत ४५ कामगार असल्याची प्राथमिक माहिती हाती लागलीय. आत्तापर्यंत १८ ते २० जणांना बाहेर काढण्यात यश आलंय.

जखमींना महापालिकेच्या इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. इमारतीच्या आणखी एका मजल्याचं काम सुरू असल्याचं तिथं काम करणाऱ्या काही कामगारांकडून समजतंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.