मुंब्र्यात इमारत कोसळली! १० ठार, १४ जखमी

ठाण्यातल्या मुंब्रा परिसरात अजून एक इमारत कोसळ्याची धक्कादायक घटना घडलीय. `स्मृती` असं या इमारतीचं नाव असून मुंब्रा स्टेशनच्या जवळ बाळाराम म्हात्रे चाळ परिसरात ही इमारत आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 21, 2013, 01:00 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंब्रा
ठाण्यातल्या मुंब्रा परिसरात अजून एक इमारत कोसळ्याची धक्कादायक घटना घडलीय. `स्मृती` असं या इमारतीचं नाव असून मुंब्रा स्टेशनच्या जवळ बाळाराम म्हात्रे चाळ परिसरात ही इमारत आहे. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही इमारत कोसळली.
तीन मजल्याची ही इमारत असून ती ३० वर्ष जूनी असल्याची माहिती मिळतेय. या इमारतीत १० कुटुंबं राहात होती. या सर्व कुटुंबियांना सुखरुप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलंय. मात्र या घटनेत १० ठार झाले आहेत तर १४ जण जखमी झाले आहेत. रात्री साधारण तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
पावसामुळे ही इमारत पडली असावी अशी शंका व्यक्त करण्यात येतेय. या इमारतीचं नाव धोकादायक इमारतीच्या यादीत समाविष्ट होतं. सध्या मदतकार्य वेगात सुरु असून ढिगा-याखाली अद्यापही ६-७ लोक अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.