ख्रिसमसनिमित्त वसईत कार्निव्हलची धूम

ख्रिसमसला आता काही तासांचाच अवधी उरलाय. त्यामुळे सगळीकडे ख्रिसमसची धूम पहायला मिळतेय. वसईत गावोगावी ख्रिसमस कार्निव्हलची धूम आहे. ख्रिसमसचा सण आल्याचा संदेश या कार्निव्हलच्या माध्यमातून ख्रिस्ती बांधव देत असतात.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 23, 2012, 11:41 PM IST

www.24taas.com, वसई
ख्रिसमसला आता काही तासांचाच अवधी उरलाय. त्यामुळे सगळीकडे ख्रिसमसची धूम पहायला मिळतेय. वसईत गावोगावी ख्रिसमस कार्निव्हलची धूम आहे. ख्रिसमसचा सण आल्याचा संदेश या कार्निव्हलच्या माध्यमातून ख्रिस्ती बांधव देत असतात.
पारंपरिक पद्धतीनं आयोजित करण्यात आलेल्या या कार्निव्हलमध्ये बच्चे कंपनीची धूम मोठ्या प्रमाणात असते. सांताक्लॉजच्या वेशातील लोक जिंगल बेलच्या गाण्यावर ताल धरतात. या कार्निव्हलमध्ये सर्व जातीधर्माचे आणि पंथाचे लोक आपआपल्या वेशभूषेत येत लोकांचं लक्ष वेधून घेतात. वसईच्या माणिकपूर नाक्यावरून या ख्रिसमस कार्निव्हलला सुरुवात झाली.
दरवर्षी या कार्निव्हलच्या माध्यमातून वेगवेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करतात. यंदाच्या वर्षी स्त्री भ्रूण थांबवा असा संदेश या कार्निव्हलच्या माध्यमातून देण्यात आलाय.