ठाणे : भिवंडी तालुक्यातील वाडा रोडवरील कवाड नजीकच्या कोलीवली गावात भरधाव कारनं उडवलेल्या दीड वर्षाच्या देवांग देवानंद पाटील या चिमुकल्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून कार चालक विश्वनाथ हुलावले याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मागील १५ वर्षांपासून दोन शेजारी कुटुंबियांमध्ये सांडपाणी आपल्या दारात येण्यावरून वाद होता. दोघांच्या नातेवाईकांनी मध्यस्थीसुद्धा केली होती.
मात्र, त्यानंतरही कुरबुरी सुरुच होत्या. पोलीस कार आणि तिचा चालक विश्वनाथ यांचा शोध घेतायत.