जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुकारलेल्या रेल रोको आंदोलनप्रकरणी आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांच्यासह ६८ जणांवर कळवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 5, 2012, 05:45 PM IST

www.24taas.com,ठाणे
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुकारलेल्या रेल रोको आंदोलनप्रकरणी आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांच्यासह ६८ जणांवर कळवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
ठाणे ते कळवादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सकाळीच ‘रेले रोको’ आंदोलन केलंय. मफतलाल झोपडपट्टी वाचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते.
या ‘रेल रोको’मुळे मध्य रेल्वेमार्गावरील दोन्ही बाजुंची लोकल वाहतूक ठप्प झालीय. ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन केल्यामुळं प्रवाशांचे हाल झालेत. गेल्या दोन दिवसांपासून पावसामुळं रखडलेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल होत असतानाच आज हा रेल्वे रोको करून राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांच्या आंदोलनानं प्रवाशांना वेठीला धरलंय.
ठाणे महापालिका आज मफतलाल झोपडपट्टीचं अतिक्रमण हटवण्यासाठी कारवाई करणार आहे. त्यापूर्वीच आव्हाडांनी हे रेल रोको आंदोलन केलंय. आज सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वे पुन्हा एकदा ठप्प झाली होती.