www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कोकण रेल्वे मार्गावर आडवली आणि निवसर रेल्वे स्टेशन दरम्यान मालगाडी पटरीवरून घसरल्याने रेल्वे सेवा एक ते दोन तास ठप्प होती. याचा फटका सहा गाड्यांना बसला. त्यामुळे रेल्वे एक ते दोन तास उशिराने धावत आहेत.
आज सकाळी 6.36 वाजता निवसर ते आडवली स्टेशनदरम्यान मालगाडीचे चाक रुळावरून घसरले. त्यामुळे कोकण रेल्वेच्या एकेरी मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णत: ठप्प पडली. त्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झालेत. या दुर्घटनेमुळे अन्य काही गाड्यांच्या वेळपत्रकावर परिणाम झालाय.
16333 वेरावल - तिरुवनंतपुरम एक्स्प्रेस, 12133 CSTM - मंगलोर जं एक्स्प्रेस, 10111 कोकणकन्या एक्स्प्रेस, 11003 दादर - सावंतवाडी राज्य राणी एक्स्प्रेस, 12202 कोचुवेली - लोकमान्य टिळक टर्मिनस गरीब रथ, 12617 एर्नाकुलम - हजरत निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेस या गाड्या उशिराने धावत आहेत.
दरम्यान, कोकण रेल्वे प्रशासनाने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. रेल्वे सेवा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम हाती घेतलेय. रेल्वे सेवा बाधित झाल्याने होणाऱ्या गैरसोयीबद्दल कोकण रेल्वेने दिलगीरी व्यक्त केली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.