गुड न्यूज : वसई-दिवा मार्गावर लोकल!

वसई - दिवा रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर... आता या रेल्वेला उपनगरीय रेल्वेचा दर्जा मिळणार आहे. त्यामुळं या मार्गावरुन लवकरच लोकल ट्रेन धावताना दिसणार आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 4, 2013, 10:57 AM IST

www.24taas.com, मुंबई
वसई - दिवा रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर... आता या रेल्वेला उपनगरीय रेल्वेचा दर्जा मिळणार आहे. त्यामुळं या मार्गावरुन लवकरच लोकल ट्रेन धावताना दिसणार आहेत.
सध्या वसई – दिवा मार्गावर मेमो ट्रेन धावत आहेत. मात्र, लोकल सुरु झाल्यानंतर भिवंडी, कल्याण परिसरात ये-जा करणा-या प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या प्रवासासाठी प्रवाशांना पाच रुपये अतिरिक्त भाडं मोजावं लागणार आहे. उपनगरीय सेवेत वर्गीकरण झाल्यानं प्रवासी भाडे पाच रुपयांनी वाढणार आहे. शिवाय या मार्गावर प्रवास करताना परतीचं तिकीट मिळत नव्हतं. तीही समस्या या नव्या सेवेमुळे दूर होऊ शकेल. आता या मार्गाचं तिकीट कोणत्याही स्थानकातून मिळू शकेल.

रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळं प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय. शिवाय घोषणा करुन न थांबता लवकरात लवकर या मार्गावर लोकल सुरु करण्याची मागणी प्रवाशांनी केलीय.