मनसे नगरसेवकाचा प्रताप, वयोवृद्ध ठेकेदाराला मारहाण

संतापाच्या भरात लोकप्रतिनिधी कोणत्या थराला जाऊ शकतात याचं उत्तम उदाहरण कल्याण-डोंबिवली महापालिकेत पहायला मिळावलं.

Updated: Dec 1, 2012, 11:59 PM IST

www.24taas.com, मुंबई
संतापाच्या भरात लोकप्रतिनिधी कोणत्या थराला जाऊ शकतात याचं उत्तम उदाहरण कल्याण-डोंबिवली महापालिकेत पहायला मिळावलं. कल्याण पूर्व भागातल्या सिद्धार्थनगरमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली म्हणून मनसे नगरसेवक नितीन निकम यांनी वयोवृद्ध ठेकेदाराला बेदम मारहाण केलीय.
या नगरसेवकांनं ठेकेदाराला मारहाण करताना त्यांच्या वयाचाही विचार केला नाही. सर्वांसमोर या नगरसेवकांनं त्याच्या सात ते आठवेळा श्रीमुखात भडकावली. मनसे नगरसेवक नितीन निकम यांनी ही मारहाण केलीय. दुसरीकडे मनसे कार्यकर्त्यांकडून या मारहाणीचं समर्थन करण्यात येतय. मुळात पाईपलाईन फुटली म्हणून ठेकेदाराला मारहाण करण्याचा अधिकार नगरसेवकांना कुणी दिला?
तसच अशा प्रकारे एखाद्या वयोवृद्ध माणसाला मारणं कितपत योग्य आहे असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेत. आता या उद्दाम नगरसेवकांवर मनसेचे वरिष्ठ नेते कोणती कारवाई करणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलय.