www.24taas.com,नवी मुंबई
नवी मुंबई महापालिकेत मंगळवारी अभूतपूर्व गोंधळ झाला. कच-याच्या ठेक्यावरून विरोधकांनी गोंधळ घालत थेट महापौरांना धक्काबुक्की केली. मात्र काँग्रेस आणि शिवेसनेच्या महिला नगरसेविकांनी मात्र उपमहापौर भरत नखाते यांच्या पाठित चपलेनं धपाटे घातले. त्यामुळं सभागृहाच्या इभ्रतीचाच कचरा झाल्याचं चित्र महापालिकेत दिसलं.
विरोधकांनी स्वीपिंग मशीनच्या प्रस्तावावर चर्चेची मागणी केली. मात्र या मागणी फेटाळून लावण्यात आली. त्यामुळं काँग्रेस- आणि शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक झाले. प्रथम त्यांनी महापालिका आयुक्त आणि पालिकेच्या अधिका-यांना डांबून ठेवले. त्यानंतर वाद टोकाला गेल्यानं पालिका आयुक्त, अधिकारी आणि महापौरांना धक्काबुक्की केली.
मात्र बाचाबाची सुरू झाली. तेवढ्यात सभागृहातून बाहेर पडणा-या उपमहापौरांनाच शिवसेनेच्या नगसेविका धीरुबाई बिजले यांनी लक्ष्य केलं आणि थेट त्यांना चपलेनं बडवण्याचाच प्रयत्न केला. लक्षवेधी प्रस्ताव न घेता , सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस ने सुरु ठेवल्याने कॉंग्रेस पक्षाने सभा त्याग केला. याचवेळी मागील पाच वर्षाच्या कालावधीत शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या सात नगरसेवकांचे नगरसेवक रद्ध करण्याचा प्रस्तावावर चर्चा करणयासाठी आला, असताना त्यावर चर्चा न करता फेटाळून लावले .यावेळी विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेने विरोध करीत सभात्याग केला.
काँग्रेस आणी शिवसेनेच्या नगरसेवकाने सभागृह बाहेर ठिया मांडून महापौर, आयुक्त आणि अधिका ऱ्यांचा रस्ता अडवला, यात सभा संपल्यावर सभागृह बाहेर पडणाऱ्या महापोराना काँग्रेस च्या महिला नगरसेविकेने धक्काबुकी केली . यात उपमहापौर आंदोलनाला बसलेल्या नगरसेवकांवर पडले, यामुळे शिवसेनेच्या नगरसेविका धीरुबाई बिजले यांनी उप महापोराना भरत नखाते चप्पल दाखवली. अशाच गोंधळात अधिकारी मात्र सभागृहात अडकून पडले. अखेर पोलीस आल्यानंतर आयुक्तांची, अधिकाऱ्यांची सुटका केली.