मुदत संपलेल्या औषधांमुळे शाळकरी मुलांना विषबाधा

डोंबिवलीत महापालिका शाळांमध्ये शिक्षण मंडळातर्फे मुदत संपलेली आयर्न आणि प्रोटीनची औषधं देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 27, 2013, 10:43 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, डोंबिवली
डोंबिवलीत महापालिका शाळांमध्ये शिक्षण मंडळातर्फे मुदत संपलेली आयर्न आणि प्रोटीनची औषधं देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय.
प्रकार वेळीच उघड झाला नसता तर पालिका शाळांतल्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला असता. त्यामुळे पालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केलाय. शनिवारी सकाळी रामनगरच्या शाळेत ही औषधं वितरीत करण्यासाठी आली असता हा प्रकार उघड झाला.
त्यावर वितरकाने घोटाळा केल्यामुळे हा प्रकार घडल्याचं शिक्षण मंडळ सदस्याने म्हटलंय. त्याचा परवाना रद्द करण्याची मागणीही करण्यात आलीय. तर ही औषधं पालिकेच्या सर्व ७४ शाळात वितरीत केल्याची बेजबाबदार कबुली सीआरसी प्रमुखांनी दिलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.