www.24taas.com, झी मीडिया, मंडणगड
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ने आज अचानक रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड जवळच्या घराडी या ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या स्नेह्ज्योती अंध मुलांच्या शाळेला भेट दिली.
सचिनच्या या भेटी बाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. आज सकाळी साडे दहा वाजता सचिन रत्नागिरी जिल्ह्यातील घराडीच्या अंध मुलांच्या शाळेत दाखल झाला. या शाळेत प्रथम त्याच्या हस्ते नयन बिंदू संगीत दालनाचे उदघाटन करण्यात आले. यानंतर सचिनने शाळेतील अंध मुलांशी संवांद साधला.
यशाचे मूलमंत्र या विषयावर त्याने शाळेतील मुलांशी गप्पा मारल्या आणि मुलांना उत्तम आरोग्यासाठी टिप्सही दिल्या. मंडणगड च्या या स्नेह्ज्योती शाळेत चालणाऱ्या विविध उपक्रमांची त्याने माहिती घेतली. शाळेच्या आवारात सचिनच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या अंध मुलांबरोबर मग सचिन क्रिकेट ही खेळला. जवळजवळ साडेतीन तास सचिन तेंडुलकर या अंध मुलांच्या शाळेत रमला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.