शिवसेनेचं आणखी एक आंदोलन फसण्याच्या बेतात?

जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाविरोधातील आंदोलनात फूट पडल्यानं शिवसेनेच्या आंदोलनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अलीकडच्या काळात शिवसेनेची अशी अनेक आंदोलनं फसल्यानं नेमकं पाणी कुठं मुरतंय याचीही चर्चा होऊ लागलीय...

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 3, 2013, 07:00 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, जैतापूर
जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाविरोधातील आंदोलनात फूट पडल्यानं शिवसेनेच्या आंदोलनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अलीकडच्या काळात शिवसेनेची अशी अनेक आंदोलनं फसल्यानं नेमकं पाणी कुठं मुरतंय याचीही चर्चा होऊ लागलीय...
जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाविरोधात जनहित कक्ष समितीनं आंदोलनातून घेतलेली माघार शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जातोय...अलीकडच्या काळात आंदोलनाच्या बाबतीत असे अनेक धक्के शिवसेनेला बसलेही आणि बदलत्या भूमिकांनी ते दुस-यांना दिलेही...रस्त्यावरची लढाई करताना कालांतरानं तलवारी म्यान झाल्या...युलसी कायदा रद्द करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यापासून ते गिरणी कामगारांना मोफत घरं देण्याच्या मागणीसाठी आणि अगदी म्हाडा इमारतीच्या पुनर्विकासाच्या प्रक्रियेत टाकण्यात आलेली हॉऊसिंग स्टॉकची अट रद्द करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरले...या विषयांमध्ये काय प्रगती झाली याची उत्तर नेत्यांनाच ठाऊक...शाहरुख खानच्या माय नेम इज खान विरोधातलं आंदोलन तर तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी साफ चिरडून टाकलं...तर कॉँग्रेस युवराज राहुल गांधींनी शिवसैनिकांच्या नाकावर टिच्चून मुंबईच्या लोकलमधून प्रवास करुन दाखवला...एकामागोमाग एक आंदोलनातून निराशा पदरी पडत असताना शिवसेनेच्या नेत्यांना आपलं अपयश मान्य नाही...
एकेकाळी राड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शिवसेनेच्या आंदोलनांच्या प्रभावाचा आलेख घसरत चालल्याचं दिसून येतंय. शिवसेनेच्या आंदोलनाच्या घटत्या प्रभावाबाबत राजकीय विश्लेषकांमध्येही मतमतांतरे आहेत. एकूणच काय शिवसेनेचा चेहरा बदलतोय...पण तो कुणाला पटतोय तर कुणाला खटकतोय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.