‘कडोंमपा’वर पुन्हा एकदा भगवाच...

कल्याण डोंबिवली महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकलाय. शिवसेनेच्या कल्याणी पाटील महापौरपदी विराजमान झाल्यात.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 11, 2013, 08:55 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कल्याण-डोंबिवली
कल्याण डोंबिवली महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकलाय. शिवसेनेच्या कल्याणी पाटील महापौरपदी विराजमान झाल्यात. या निवडणुकीत मनसे तटस्थ राहिल्याचा फायदा शिवसेनेला झालाय. कल्याणी पाटील यांनी राष्ट्रवादीच्या वंदना गीध यांचा पराभव केला.
कल्याणी पाटील यांना ४७ तर वंदना गीध यांना ३० मतं मिळाली. कल्याणी पाटील यांना शिवसेनेचे ३१, भाजपाचे ९ आणि अपक्ष ७ अशी एकूण ४७ मते मिळाली. मनसेच्या छुप्या पाठिंब्यामुळं कल्याण डोंबिवलीत शिवसेनेच्या महापौर विराजमान झाल्यात तर उपमहापौरपदी भाजपचे राहुल दामले विजयी झालेत. त्यांनी राष्ट्रवादीचे विकास म्हात्रे यांचा पराभव केला.

विरोधी पक्षातील तीन नगरसेवक गैरहजर राहिल्यानं आघाडीला अपेक्षित मतंदेखील मिळाली नाहीत. कडोंमपाची महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक शनिवारी महापालिका मुख्यालयात पार पडली.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.