www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
सध्या एक ठाणेकर मराठी तरूण इंग्रजी बुकस्टॉलवर धुमाकूळ घालतोय. सुदीप नगरकर असं त्याचं नाव. त्यानं गेल्या ३ वर्षांत ३ इंग्रजी कादंब-या लिहिल्यात आणि त्या तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाल्यात. सध्या त्याची `इट स्टार्टेड विथ फ्रेंड रिक्वेस्ट` ही कादंबरी गाजयेत.
मुळात इलेक्ट्रॉनिक इंजिनियरिंगचा विद्यार्थी असलेल्या सुदीपला डायरी लिहिण्याची सवय. आपल्या कॉलेजच्या सगळ्या आठवणी त्यानं लिहून ठेवल्यात. त्यावरच आधारित असलेल्या तीन कादंब-या सध्या वाचकांना आकर्षित करतायत. २०११ साली त्यानं `फ्यू थिंग्ज लेफ्ट अनसेड` ही पहिली कादंबरी लिहिली. तिच्या तब्बल २ लाख आवृत्त्या विकल्या गेल्यात. त्यानंतर गेल्यावर्षी जुलैमध्ये आलेल्या `दॅट्स द वे वूई मेट` या कादंबरीच्याही ७५ हजारांच्या वर आवृत्त्या खपल्यात.
तिस-या इट स्टार्टेड विथ फ्रेंड रिक्वेस्ट या कादंबरीच्या ५ हजार प्रती २ आठवड्यांत विकल्या गेल्यात. निल्सन बुक स्कॅनच्या अहवालानुसार ही सध्या ७व्या क्रमांकाची बेस्टसेलर कादंबरी ठरतेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.