सूरज परमार आत्महत्या प्रकरण, चारही आरोपी नगरसेवकांची शरणागती

ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी चारही नगरसेवक आज सकाळी नऊ वाजता ठाण्यातील एसीबी कार्यालयात शरण आले. मुंबई उच्च न्यायालयाने एक डिसेंबरला या चौघांना शरण येण्याचे आदेश दिले होते.. त्यानूसार विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष नजीब मुल्ला, काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण आणि ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण हे चौघेजण आज शरण आलेत.. 

Updated: Dec 5, 2015, 11:17 AM IST
सूरज परमार आत्महत्या प्रकरण, चारही आरोपी नगरसेवकांची शरणागती title=

ठाणे : ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी चारही नगरसेवक आज सकाळी नऊ वाजता ठाण्यातील एसीबी कार्यालयात शरण आले. मुंबई उच्च न्यायालयाने एक डिसेंबरला या चौघांना शरण येण्याचे आदेश दिले होते.. त्यानूसार विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष नजीब मुल्ला, काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण आणि ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण हे चौघेजण आज शरण आलेत.. 

मुंबई उच्च न्यायालयाने त्यासंबंधीचे आदेश एक डिसेंबरला दिले होते. बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत ठाणे महापालिकेतल्या चार नगरसेवकांची नावं लिहीली होती. 

ठाणे सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यावर या नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मंगळवारी उच्च न्यायालयाने या चौघांना अटकपूर्व जामीन फेटाळल्यावर त्यांना ठाणे पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.