एका चौकात सेनेचे एक तर राष्ट्रवादीचे दुसरे शिवाजी महाराज!

ठाण्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी येणार असल्यानं आता ठाण्यातलं राजकारणं पुतळ्यांभोवती फिरु लागलय.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 27, 2013, 06:55 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाण्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी येणार असल्यानं आता ठाण्यातलं राजकारणं पुतळ्यांभोवती फिरु लागलय.
कळवा नाक्यावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेन्द्र आव्हाड यांनी राष्ट्रपतीना बोलावलय. त्यासाठी २८ तारखेला राष्ट्रपती कळव्यात येतायत. कळवा नाक्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा असताना दुसरा पुतळा कशासाठी हा प्रश्न सुजाण ठाणेकर विचारतायत.
पुतळा उदघाटनाच्या छोट्या कार्यक्रमासाठी राष्ट्रपतींना पाचारणं करण्याची गरज आहे का हा ही सवाल ठाणेकरांकडुन विचारला जातोय. ज्या ठिकाणी पुतळ्याचं उद्घाटन होतय तिथेच राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेन्द्र अव्हाडांचे आणि शिवसेनेचही अनधिकृत पक्ष कार्यालय आहे.
या सर्व कारणांमुळे पुतळ्याच्या अनावरासाठी राष्ट्रपतींनी येवू नये अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते नितीन देशपांडे यांनी राष्ट्रपतींना इमेल करुन कळवली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x