नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोटबंदीनंतर ५ राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी पहिल्या वर्षात 2017-2018 च्या बजेटमध्ये काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा केली आहे.
- छोट्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १९०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यामध्ये राज्यांची देखील मदत असणार आहे.
- मागील बजेटमध्ये ५५०० कोटीच्या तुलनेत यंदा १३००० कोटी रुपये शेतकरी वीमा योजनेसाठी देण्यात आले आहे.
- शेतकऱ्यांच्या हितात मातीच्या परीक्षणासाठी १०० हून अधिक लॅब तयार केले जाणार आहेत.
- पिक विमाचं कव्हरेज ५० टक्क्यापर्यंत वाढवला.
- कृषी क्षेत्रात 4.1 टक्के वृद्धी दर दिसली. फार्म क्रेडिटसाठी १० लाख कोटींचं लक्ष्य बजेटमध्ये करण्यात आलं आहे.
- पीक विमा आता ३० टक्क्यांऐवजी ४० टक्के असणार आहे.