नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेत बजेट सादर केलं. पण पहिल्यांदाच अर्थसंकल्प आणि रेल्वे बजेट एकत्र सादर होत आहे. अरुण जेटली यांनी घोषणा केली आहे की, आता IRCTC वरुन E-तिकीट बुक केल्यास सर्विस टॅक्स नाही द्यावा लागणार. यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
- IRCTC वरुन E-तिकीट बुक केल्यास नाही लागणार सर्विस टॅक्स
- धार्मिक आणि पर्यटनासाठी विशेष ट्रेन, ई-टिकटने रेल्वे प्रवास करणार स्वस्त
- रेल्वेसाठी 1.31 लाख कोटी रुपयांची घोषणा करोड़ रुपये का बजटीय प्रावधान किया गया है।
- मेट्रो रेल्वेसाठी नव्या योजना आखल्या जातील.
- ई तिकीटवर सर्विस टॅक्स नाही लागणार.
- ट्रेनमध्ये बायो टॉईलेट तयार केले जाणार. २०१९ पर्यंत ते पूर्ण केले जाणार.
- २०२० पर्यंत मानवविरहीत फाटक तयार केले जातील.
- 2017-18 मध्ये 3500 किलोमीटरपर्यंतची आणखी रेल्वेचं जाळं पसरवलं जाईल.
- रेल्वे सरंक्षणासाठी एक लाख कोटीची घोषणा
- रेल्वे प्रवाशांची सुरक्षा, स्वच्छता, विकास यावर फोकस केलं जाणार.
- कोचसंबधित तक्रारींसाठी कोच मित्र योजनेची घोषणा