www.24taas.com, मुंबई
आमदार क्षितीज ठाकूर यांना धमकावणा-या पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना संतप्त आमदारांनी विधान भवनाच्या आवारातच मारहाण केली आहे. त्यामुळे यात पोलीस निरिक्षक सचिन सूर्यवंशी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक सूर्यवंशी आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार यांच्यात वांद्रे वरळी सी-लिंकवर वाद झाला होता. ठाकूर यांची कार ११०च्या वेगाने चालवली जात होती. त्यामुळे सूर्यवंशी यांनी ठाकूर यांची कार आडवली आणि त्यांच्याकडून दंड वसूल केला. या गोष्टीचाच राग ठाकूर यांच्या मनात होता. विधानसभेमध्येही त्यांनीसूर्वंशी विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता.
यावेळी स्वतः सूर्यवंशी प्रेक्षक गॅलरीत उपस्थित होते. ही गोष्ट कळताच विधानभवन परिसरातच सूर्यवंशी आणि ठाककुर यांच्यात वाद झाला. त्यावर विधानसभेत गोंधळ होऊन कामकाज तहकुब करावं लागलं. यानंतर सर्व आमदारांनी सूर्यवंशी यांना बाहेर बोलावून घेतलं. आणि विधान भवन परिसरात सूर्यवंशी यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे सूर्वंशी बेशुद्ध पडले आणि त्यांना विधीमंडळातून स्ट्रेचरवरून सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.